संगीत साधनेसोबतच आपल्या रूढी परंपरांचे जतन करून त्या नव्यापिढीकडे हस्तांतरित व्हाव्यात या दृष्टीने एक एक पाऊल पुढे जात सामाजिक भान जपणारी 'सूर-ताल' विलेपार्ले(पूर्व) ही संस्था विविध माध्यमातून अनेक उपक्रम राबवित असते. नुकतीच या संस्थेने जेष्ठ नागरिकांसोबत 'शेतातील गाणे आणि स्वादिष्ट खाणे' या धर्तीवर हुर्डा पार्टी आयोजित करून एकल जेष्ठांमध्ये स्नेह वाढवला. येत्या मकरसंक्रांतीच्या निमित्ताने 'सूर-तालने आज रविवार दिनांक १४ जानेवारी २०२४ रोजी 'चली चली रे पतंग' या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
गायक रुदय, अमित, उमेश, अर्चना आणि अमृता हे या कार्यक्रमात आपला स्वर मिसळणार असून प्रामुख्याने मकरसंक्रातीचे महत्व विशद करणाऱ्या लोकप्रिय गीतांतून हिंदू संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. हिंदी - मराठी लोकप्रिय चित्रपट गीतांचा या कार्यक्रमात समावेश असणार आहे. आकाशवाणीच्या प्रसिध्द आरजे पद्मजा बापये या कार्यक्रमाचे रंजक आणि खुसखुशीत निवेदन करणार आहेत.
रविवार दिनांक १४ जानेवारी २०२४ रोजी संध्याकाळी ५:४५ ते ८:३० या वेळेत चित्तपावन ब्राह्मण संघ, निकदवारी लेन, सिटी को ऑप बँकेची गल्ली, गिरगांव, मुंबई ४०० ००४ येथे संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून प्रवेश नोंदणी आवश्यक आहे. त्यासोबतच काही रांगा महिलांसाठी राखीव असणार आहेत. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन महेश कालेकर आणि भूषण शितूत यांच्याकडे आहे.