आणखी एका टीव्ही सेलिब्रेटी कपलच्या घरी एक गोड बातमी येणार आहे. अभिनेत्री आणि मॉडेल रोशेल राव आणि कीथ सिक्वेरा लवकरच पालक होणार आहेत. या कपलने सोशल मीडियावर ही गोड बातमी शेअर केली होती. लग्नाच्या ५ वर्षांनंतर आई-वडील होण्यासाठी हे जोडपे खूप उत्सुक आहे.
'बिग बॉस' कपल कीथ आणि रोशेल राव पालक बनणार आहेत प्रेग्नेंसी फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून या जोडप्याने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. कीथ आणि रोशेलने इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये रोशेल राव बेबी बंप दाखवत आहे. हे फोटो शेअर करताना त्याने एक सुंदर कॅप्शनही लिहिले आहे की, 'दोन छोटे हात, छोटे पाय, मुलगी असो की मुलगा, आम्हाला लवकरच त्याला भेटायचे आहे, हो तुमचा अंदाज बरोबर आहे, आम्ही पालक होणार आहोत. '
या जोडप्याने समुद्रकिनारी हे मॅटर्निटी शूट केले आहे, ज्यामध्ये कीथ आणि रोशेल रोमँटिक पोज देताना दिसत आहेत. हे जोडपे गुलाबी आउटफिटमध्ये ट्विनिंग करताना दिसत आहे. रोशेलने गुलाबी रंगाचा गाऊन घातला आहे, तर किथनेही गुलाबी रंगाचा शर्ट घातला आहे. दोघेही एकत्र छान दिसत आहेत. कपलने दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत, तो रोशेलच्या बेबी बंपवर कान ठेवताना दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत कीथ आपली पत्नी रोशेलच्या कपाळाचे चुंबन घेताना दिसत आहे.
चाहते आणि सेलिब्रिटी त्यांच्या या पोस्टवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. प्रेमळ प्रतिक्रिया पाठवून पालक आणि बाळावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत, तसेच या नवीन प्रवासासाठी जोडप्याचे अभिनंदन करत आहेत.
कीथ सिकेरा आणि रोशेल राव यांनी 2018 मध्ये तामिळनाडूच्या महाबलीपुरममध्ये एका खाजगी समारंभात लग्न केले होते. 'बिग बॉस 9' व्यतिरिक्त 'नच बलिए 9'मध्येही दोघे एकत्र दिसले होते. लग्नाच्या ५ वर्षांनंतर हे जोडपे पालक बनणार आहे.