पनीर अमृतसरी
साहित्य : 7-8 लसूण पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या, चिमूटभर ओवा, 1 टेबलस्पून जिरे, 1 उभा कापलेला कांदा,
2 टोमॅटोची प्युरी, अर्धी जुडी पालक, 3 टेबलस्पून मेथीची पाने, 250 ग्रॅम पनीर (चौकोनी आकारात कापलेले),
अर्धा टीस्पून हळद, 2 टेबलस्पून तेल, चवीनुसार मीठ.
कृती : कढईत तेल गरम करून यात लसूण, ओवा, बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या आणि जिरे टाका. थोडा वेळ परतून यात कांदा सोनेरी रंगावर परतून घ्या. आता यात टोमॅटो प्युरी, पालक, मेथीची पाने, हळद आणि मीठ टाका. 3-4 मिनिटे शिजवून घ्या. पनीर टाकून मंद आचेवर पाच मिनिटे शिजवून घ्या. गरम गरम पनीर अमृतसरी सर्व्ह करा.
गार्लिक नान
साहित्य : 5 ग्रॅम यीस्ट, 1 किलो मैदा, 200 मि.ली. दूध, 2 अंडी, 50 ग्रॅम दही, 15-20 लसूण पाकळ्या, 2 टेबलस्पून कोथिंबीर, चवीनुसार मीठ.
कृती : एका मोठ्या बाऊलमध्ये गरम पाणी घेऊन त्यात यीस्ट टाका. 10 मिनिटे पाणी तसेच ठेवून यीस्ट पूर्णतः मिसळल्यानंतर यात मैदा, दूध अंडी, दही, कापलेली कोथिंबीर आणि मीठ टाकून पीठ चांगले मळून घ्या. हे पीठ काही तास तसेच ठेवा. हे पीठ फुगून दुप्पट होईल. यानंतर याचे छोटे छोटे गोळे करून यात कापलेला वा ठेचलेला लसूण घाला. पातळ पोळी लाटून ग्रीलला तेल लावून भाजून घ्या. बटर लावून नान सर्व्ह करा.