Close

पनीर पराठा (Paneer Paratha)

पनीर पराठा



साहित्य : सारणासाठी : 250 ग्रॅम पनीर, 1 कांदा (बारीक चिरलेला), 2-3 हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या), 1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडे किसलेले आले, 1 टीस्पून लाल मिरची पूड, पाव टीस्पून भाजलेल्या जिर्‍याची पूड, पाव टीस्पून चाट मसाला.
कणकेसाठी : 3 गप गव्हाचे पीठ, स्वादानुसार मीठ.
इतर : बटर.
कृती : नेहमीप्रमाणे कणीक मळून घ्या. पनीर स्मॅश करून घ्या. पनीरमध्ये कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, आले, लाल मिरची पूड, जिरेपूड, चाट मसाला व मीठ घालून एकजीव मिश्रण तयार करा.
कणकेच्या लिंबाएवढ्या गोळ्या तयार करून, चपात्या लाटून घ्या. एका चपातीवर पनीरचे मिश्रण व्यवस्थित पसरवून, त्यावर दुसरी चपाती ठेवा आणि पाण्याच्या साहाय्याने कडा बंद करून घ्या. हा पराठा अलगद तव्यावर ठेवून मध्यम आचेवर दोन्ही बाजूने बटर लावून खमंग भाजून घ्या.

Share this article