पनीर टोस्ट सँडवीच
साहित्यः 6 ब्रेडचे स्लाईसेस, 3 टेबलस्पून उभा पातळ चिरलेला कांदा, 3 टेबलस्पून भोपळी मिरची, 1 टीस्पून चाट मसाला, 3 टेबलस्पून हिरवी चटणी, 1 टेबलस्पून बटर.
स्टफिंग: 75 ग्रॅम पनीर, लहान चौकोनी तुकडे, अर्धा टीस्पून जिरेपूड, 2 ते 3 टेबलस्पून टोमॅटो केचप, चवीपुरते मीठ.
कृती: एका बाऊलमध्ये टोमॅटो केचप, जिरेपूड आणि अगदी चिमूटभर मीठ घालून मिक्स करावे. यामध्ये पनीरचे तुकडे 10 मिनिटे मॅरीनेट करावेत. पनीरचे तुकडे ग्रील करावे. जर ग्रील नसेल तर नॉनस्टिक पॅनमध्ये थोड्या बटरवर किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये थोडे परतून घ्यावे. ग्रील केल्यावर पनीर बाजूला काढून ठेवावे. ब्रेड स्लाईसेस वर बटर लावून घ्यावे. कमी आचेवर ब्रेड, थोडे टोस्ट करून घ्यावे. 3 ब्रेड स्लाईसेस वर हिरवी चटणी लावून घ्यावी. त्यावर पनीरचे तुकडे आणि भाज्या घालाव्यात. थोडा चाट मसाला भुरभुरावा. आता उरलेले ब्रेड स्लाईसेस घेऊन त्यावर हिरवी चटणी लावावी. आणि पनीरच्या तुकड्यांवर ठेवून सँडविच तयार करावे. सँडविचेस ग्रील करून घ्यावे किंवा नॉनस्टिक पॅनमध्ये थोडे बटर घालून दोन्ही बाजू मध्यम आचेवर टोस्ट करावे. सँडविच हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो केचपसोबत सर्व्ह करावे.