Close

लग्नानंतर पहिल्यांदाच दिसले मिस्टर अॅण्ड मिसेस चड्ढा, अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर लढलीय नववधूची लाली (Parineeti Chopra-Raghav Chadha Make First Public Appearance After Marriage)

२५ सप्टेंबर रोजी परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा हे दोघेही लग्न झाल्यावर पहिल्यांदाच नवविवाहित जोडपे म्हणून सार्वजनिकपणे दिसले. लग्नाचे सर्व विधी पूर्ण करून नवविवाहित जोडपे उदयपूरहून निघाले असून लवकरच ते दिल्लीला पोहोचणार आहेत. दरम्यान, लग्नानंतर चड्ढा घराण्याच्या नव्या सुनेचा फोटो समोर आला आहे.

उदयपूरमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला आणि अखेर परिणीती चोप्राची मिसेस चड्ढा बनली.

नवविवाहितांचे लग्नाचे फोटो इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत आहेत.

लग्नानंतर, हे जोडपे उदयपूरहून दिल्लीला जात असताना पापाराझींनी परिणीती आणि राघवला पहिल्यांदा आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा अखेर 24 सप्टेंबर 2023 रोजी उदयपूर (राजस्थान) येथील लीला पॅलेसमध्ये विवाहबंधनात अडकले. नवविवाहित जोडप्याचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटीही सोशल मीडियावर नवविवाहित जोडप्याचे अभिनंदन करत आहेत.

Share this article