Close

लॉस एंजिलेसमध्ये राहूनही प्रिती झिंटी जपतेय भारतीय संस्कृती, दोन्ही मुलांचे केले मुंडण (Preity Zinta Performs Twins Gia-Jais Mundan Ceremony In LA)

2021 मध्ये सरोगसीद्वारे आई बनलेली बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने लॉस एंजेलिसमध्ये तिच्या जुळ्या मुलांचे मुंडण केले. मुंडन सोहळ्यानंतर प्रिती झिंटाने तिच्या जुळ्या मुलांचा एक अतिशय गोड फोटो शेअर केला आहे, त्यासोबतच एक चिठ्ठीही शेअर केली असून, या सोहळ्याचे महत्त्वही प्रिती झिंटाने सांगितले आहे. प्रियांका चोप्रा आणि बॉबी देओलसह अनेक सेलिब्रिटींनी व्हायरल होत असलेल्या या फोटोला लाईक आणि कमेंट केल्या आहेत.

प्रीती झिंटाने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या जुळ्या मुलांचा जिया आणि जय यांचा अतिशय सुंदर फोटो शेअर केला आहे. अभिनेत्रीने लॉस एंजेलिसमध्ये जय आणि जिया या दोन्ही मुलांचे मुंडण केल्यानंतर हा फोटो क्लिक केला आहे.

शेअर केलेल्या फोटोमध्ये दोन्ही मुलांचे चेहरे दिसत नाहीत. दोघेही कॅमेऱ्याकडे पाठ करून बसले आहेत. पण तरीही जय आणि जिया मागून खूप क्यूट दिसत आहेत. फोटोमध्ये, जिया राखाडी रंगाचा फ्रॉक परिधान करताना दिसत आहे आणि जय देखील बहीण जियासोबत राखाडी रंगाचा टी-शर्ट आणि हिरवी पँट परिधान केलेला पाहायला मिळत आहे. दोन्ही मुले खेळण्यांसोबत खेळताना दिसत आहेत.

फोटो शेअर करताना अभिनेत्रीने एक लांबलचक नोटही लिहिली आहे. यात अभिनेत्रीने मुंडन सोहळ्याचे महत्त्वही स्पष्ट केले आहे. अभिनेत्रीने लिहिले - अखेरीस, या वीकेंडला मुंडण समारंभ झाला. हिंदू लोकांसाठी, मुलांचे केस प्रथमच मुंडवणे हे त्यांना त्यांच्या भूतकाळातील जन्म आणि भूतकाळातील आठवणींपासून मुक्त करण्याचे लक्षण आहे.

मुंडन समारंभानंतर, जेव्हा अभिनेत्रीने आपल्या मुलांचा एक मोहक फोटो शेअर केला, तेव्हा नेटिझन्सनी तिच्यावर कमेंट बॉक्समध्ये प्रेमाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. ते म्हणू लागले की अभिनेत्री तिच्या मुळाशी जोडलेली आहे. एकाने लिहिले - तू हिंदू स्त्री आहेस आणि जिचा सर्वांना अभिमान आहे. तुम्हा दोघांना खूप खूप प्रेम आणि आशीर्वाद! अनेक नेटकऱ्यांनी या जोडप्याचे अभिनंदन केले आहे. प्रियांका चोप्रा, बॉबी देओल, डायना पेंटी यांच्यासह इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनीही अभिनेत्रीच्या जुळ्या मुलांचा फोटो आवडला आहे.

Share this article