ग्लोबल स्टार बनलेल्या अभिनेत्री प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीला तिच्या वडिलांची आठवण झालेली पाहायला मिळते. प्रियांका चोप्राच्या वडिलांची पुण्यतिथी नुकतीच पार पाडली. यावेळी प्रियांकाने त्यांच्या स्मरणार्थ घरी विशेष पूजा ठेवली होती. पूजेच्या या फोटोंमध्ये अभिनेत्रीची मुलगी मालती मेरी चोप्रा देखील दिसत आहे. गुलाबी लेहेंग्यात मालती खूपच क्यूट दिसत आहे.
इंटरनॅशनल स्टार बनलेल्या प्रियांका चोप्राने तिच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त लॉस एंजेलिस येथील घरी विशेष पूजा केली होती. ज्याचे फोटो अभिनेत्रीने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केले आहेत. इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केलेल्या या फोटोंमध्ये अभिनेत्री आणि तिचे कुटुंब दिसत आहे.
एका फोटोमध्ये अभिनेत्रीची मुलगी मालती कोणाचा तरी हात धरून चालताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, पूजेचे हे फोटो तिच्यासाठी खूप खास आहेत. कारण ही पूजा तिचे वडील डॉ.अशोक चोप्रा यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आली होती.
प्रियांका चोप्राची मुलगी मालती मेरी याआधी काढलेल्या फोटोमध्ये लेहेंगा घालून पाहायला मिळाली. यानंतर अभिनेत्रीने पूजेचा आणखी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मालती जमिनीवरून फुले उचलताना दिसत आहे. या फोटोसोबत अभिनेत्रीने कॅप्शन लिहिले, "पूजेची वेळ, मिस यू नाना".
दुसऱ्या एका फोटोमध्ये नानांच्या फोटोसमोर अभिनेत्रीची मुलगी मालती दिसत आहे. हा सुंदर फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'मिस यू डॅड' असे लिहिले आहे. या फोटोत मालती प्रिंटेड ड्रेसमध्ये क्युट दिसत आहे.
प्रियांका चोप्राचे वडील डॉ. अशोक चोप्रा यांचे २०१३ मध्ये कर्करोगामुळे निधन झाले होते. तेव्हा ते 62 वर्षांचे होते. ते भारतीय लष्करात फिजिशियन होते.