बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राची चुलत बहीण अभिनेत्री मीरा चोप्रा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिची लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात लग्नाआधीच्या सर्व सोहळ्यांबद्दल माहिती देण्यात आली आहे. मीरा राजस्थानमधील जयपूरमध्ये लग्नगाठ बांधणार आहे. तिच्या होणाऱ्या पतीचं नाव रक्षित केजरीवाल आहे.
मीरा चोप्रा ही सुदेश व नीलम चोप्रा यांची लेक आहे. मिरा चोप्रा ही तिचा बॉयफ्रेंड रक्षित केजरीवालसोबत १२ मार्च रोजी लग्न करणार आहे.
मिरा चोप्राच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला ११ मार्चपासून सुरुवात होणार आहे. मीरा आणि रक्षित यांच्या मेहंदी सोहळ्यानंतर संगीत आणि कॉकटेल नाईट असणार आहे. १२ मार्च रोजी दिवसभर हळदी समारंभ होईल आणि त्यानंतर संध्याकाळी मीरा आणि रक्षित यांची वरात असणार आहे. जयपूरमधील कुंडा येथील एका आलिशान हॉटेलमध्ये मिरा आणि रक्षित यांचे लग्न होणार आहे.
मिरा आणि रक्षित जयपूरमध्ये बांधणार लग्नगाठ. २०१८ मध्ये प्रियांका चोप्राने निक जोनाससोबत जोधपूरच्या उम्मेद भवनमध्ये लग्न केले. तर गेल्या वर्षी परिणीती चोप्राने राघव चढ्ढासोबत उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली. प्रियांका आणि परिणीतीप्रमाणे मीरा चोप्राही राजस्थानमध्ये लग्न करणार आहे. जयपूरमध्ये ती रक्षितसोबत लग्नगाठ बांधणार आहे.
'अंबे आरुयरे' या तमिळ चित्रपटातून मिरानं अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. मीरा चोप्राने बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. तिने '1920 लंडन', 'सफेद', 'सेक्शन 375' आणि 'गँग ऑफ घोस्ट' या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. मिरा चोप्रा ही सोशल मीडियावर विविध लूकमधील फोटो शेअर करत असते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. मिराला सोशल मीडियावर 507k फॉलोवर्स आहेत.