Close

पु. ल. देशपांडे यांनी भर कार्यक्रमात लतादीदींना दिलेली ही उपमा ( Pu. La. Deshpande Praises Lata Mangeshkar In Meeting)

आपल्याकडे इंडस्ट्रीत प्रत्येक क्षेत्रात मातब्बर असे उत्कृष्ट कलावंत लाभले आहेत. त्यातील काही कलावंत आज हयात नाहीत मात्र तरीही त्यांचे आठवणीतले किस्से सर्वत्र गाजत असतात. असाच एक मराठी सिनेसृष्टीला लाभलेला उत्कृष्ट अवलिया म्हणजेच पु ल देशपांडे. आज ८ नोव्हेंबर रोजी त्यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्याबद्दलचा एक खास किस्सा जाणून घेऊ.
महाराष्ट्राला किंबहुना भारताला लाभलेला अजून एक अनोकरत्न म्हणजे लता मंगेशकर. आपल्या मंजूर सुरेल आवाजाने त्यांनी सर्वांनाच भुरळ घातली होती. त्यांचा आवाज आज आहे रसिक प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. पु ल देशपांडे यांनी लता मंगेशकर यांचे कौतुक केलेले तोहा किस्सा.
१९८९ मध्ये जागतिक मराठी परिषदेत पु ल देशपांडे यांनी एक भाषण केलेले. त्यावेळेस वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.
तेव्हा लतादीदींचे कौतुक करताना पू ल. म्हणाले होते की, . ‘मला जर एखाद्यांने विचारलं की, आकाशात देव आहे का?, तर मी सांगेन देव आहे की नाही मला माहीत नाही. मात्र ह्या आकाशात सुर्य आहे, चंद्र आहे आणि लताचा स्वर आहे. दिवस रात्र अशी कुठलीही वेळ नाही, क्षण नाही की लताचा स्वर या जगात कुठून तरी कुठे जात असतो.' पु. ल. देशपांडे यांचे हे शब्द तिथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या मनाला भिडले आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट ऐकू येऊ लागला

Share this article