साऊथचा सुपरस्टार आर माधवन फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या डिनरमध्ये सहभागी होण्यासाठी पॅरिसला गेला होता. अभिनेत्याने सोशल मीडियावर या डिनरदरम्यान पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत काढलेले फोटो, आणि मनाला भिडणारी सुंदर नोट शेअर केली. या पोस्टमध्ये अभिनेत्याने पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे कौतुक केले आहे.
आर. माधवन (@actormaddy) यांनी शेअर केलेली पोस्ट
साऊथ सुपरस्टार आर माधवनने सोशल मीडियावर त्याचे नवीन फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये आर माधवन पीएम मोदींचे अभिनंदन करताना दिसत आहे. या फोटोंमध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉनही त्यांच्यासोबत आहेत. आर माधवनने शनिवारी फ्रान्समधील लूवर संग्रहालयात पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या डिनरला हजेरी लावली होती.
पहिल्या फोटोमध्ये अभिनेता मोठ्या उत्साहात पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत हस्तांदोलन करत आहे. पीएम मोदींसोबत फ्रान्सचे राष्ट्रपती व इतर अनेक मान्यवर डिनर टेबलवर बसले आहेत. दुसऱ्या फोटोत, माधवन तीन वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेते आणि संगीतकार रिकी केज आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत दिसत आहे.
अभिनेत्याने या फोटोंसोबत एक व्हिडिओही शेअर केला आहे. फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना, माधवनने कॅप्शनमध्ये लिहिले की, 14 जुलै 2023 रोजी पॅरिसमध्ये झालेल्या बॅस्टिल डे सेलिब्रेशनदरम्यान, भारत-फ्रेंच संबंध दोन्ही देशांच्या नागरिकांसाठी चांगले करण्याची उत्कटता आणि समर्पण स्पष्ट आणि तीव्र होते.
या पोस्टमध्ये आर माधवन यांनी पीएम मोदी आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे खूप कौतुक केले आहे, तसेच दोघांचेही आभार मानले आहेत. आर माधवनची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.