दिशा परमारने तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिशा आणि राहुल पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहेत. मस्ती करत असताना राहुल दिशासोबत रोमँटिक झालेला पाहायला मिळाल्याने, लोक त्याला ट्रोल करत आहेत.
बडे अच्छे लगते हैं 3 मधील प्रियाच्या भूमिकेने घराघरात प्रसिद्ध झालेली दिशा परमार लवकरच आई होणार आहे. सध्या ती तिच्या प्रेग्नेंसी प्रवासाचा आनंद घेत आहे.
अभिनेत्री अनेकदा तिचे आणि पती गायक राहुल वैद्यचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
टीव्ही अभिनेत्री दिशा परमार सध्या पती राहुल वैद्यसोबत सहलीचा आनंद घेत आहे. दोघेही लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यासाठी सहलीला गेले आहेत.
अभिनेत्रीने तिच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करतानाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये दिशा आणि राहुल स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहेत. पूलमध्ये हे जोडपे ज्या पद्धतीने मस्ती करत होते ते पाहून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे.
याआधी दिशाने तिचा आणखी एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तिने लाल रंगाची मोनोकिनी घातली होती. आणि आता अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये दिशा तिच्या पतीसोबत पूलमध्ये खूप मस्ती करताना दिसत आहे.
पूलमध्ये मस्ती केल्यानंतर दोघेही त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करताना दिसले. सेलिब्रेशन दरम्यान दोघांनी दोन केक कापले.
हा व्हिडिओ शेअर करत दिशाने कॅप्शनमध्ये लिहिले- 'माझ्या आवडत्या व्यक्तीसोबतची 2 वर्षे. त्यांच्यासोबतच्या आठवणी जपणे हा माझा आवडता छंद आहे.
हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर काही यूजर्स तिला ट्रोल करत आहेत. गरोदरपणात पूलमध्ये रोमान्स करण्यावर नाराजी व्यक्त करत युजर्स कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत आहेत.
कमेंट करताना कोणीतरी लिहिले - ती प्रेग्नंट आहे, काळजी घे राहुल. तर कोणी म्हणतंय की पूलमध्ये अशाप्रकारे रोमान्स करणं कठीण जाऊ शकतं, तर दुसरीकडे काही चाहते आहेत ज्यांना दिशा आणि राहुलचा हा पूल व्हिडिओ खूप आवडला आहे.