राजमा आणि बटाट्याचे सॅलड
साहित्य: 1 वाटी भिजवून शिजवलेले राजमा, 2 उकडलेले बटाटे, 2 टोमॅटोचे चौकोनी कापलेले तुकडे, 4 हिरवे कांदे चिरलेले, 2 चमचे चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ. मसाला करण्यासाठी: 4 चमचे ऑलिव्ह तेल, 4 चमचे लिंबाचा रस, अर्धा टीस्पून भाजलेली जिरे पावडर, चवीनुसार मीठ आणि मिरी पावडर.
कृती : बटाटे सोलून त्याचे छोटे तुकडे करा. एका भांड्यात राजमा, बटाटे, टोमॅटो, मीठ, पातीचा कांदा आणि कोथिंबीर मिक्स करा. मसाल्याचे सर्व साहित्य भाज्यांमध्ये चांगले मिसळा. सर्व्ह करण्यापूर्वी थंड करुन आणि चांगले मिसळा.
Link Copied