Close

लाडक्या परीला घरी घेऊन निघाला रामचरण, अभिनेता आणि पत्नी उपासनाच्या चेहऱ्यावर दिसतोय आईबाबा झाल्याचा आनंद (Ram Charan Takes His Little Baby Girl At Home, Actor And Wife Upasana’s Face Shows The Joy Of Becoming Parents)

साऊथचा सुपरस्टार राम चरण आणि उपासना यांना लग्नानंतर ११ वर्षांनी कन्यारत्न प्राप्त झालं. उपासनाने २० जूनला मुलीला जन्म दिला. तिला १९ जूनला अपोलो हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. त्यानंतर मध्यरात्री तिने मुलीला जन्म दिला. आता मुलीच्या जन्मानंतर ३ दिवसांनी त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.

रामचरणचा आपल्या पत्नी आणि नवीन बाळासोबतचा पहिला फोटो समोर आला आहे. फोटोत रामचरण आणि त्याची पत्नी हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसत आहे. अभिनेत्याने आपल्या लाडक्या मुलीला कुशीत घेतले आहे. बाळाचा चेहरा दिसत नाही. रामचरण आणि उपासनासोबत अभिनेत्याची आईदेखील आहे.

अभिनेता चिरंजीवी यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आजोबा झाल्याचा आनंद व्यक्त केला होता. त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले होते की तुझे स्वागत आहे छोटी मेगा प्रिन्सेस, तू लोकांमध्ये आनंद पसरवला आहेस, तुझ्या येण्याने करोडो लोक धन्य झाले आहेत. राम चरण आणि उपासना आईबाबा आणि आम्ही दोघे आजीआजोबा झाल्यामुळे खूप खुश आहोत.  

Share this article