रॅपर बादशहा, अरमान मलिक, निकिता गांधी, नीति मोहन, डी एमसी, इक्का, डिनो जेम्स आणि अभिनेता व डीजे अली मर्चंट असे लोकप्रिय गायक ‘बूम बॉक्स’ कार्यक्रमाच्या दुसऱ्या आवृत्तीत सहभागी होणार आहेत. रॉयल स्टॅग प्रस्तुत ‘लिव्हिंग ॲट लार्ज’ या भावनेचा उत्सव असलेला हा संगीत कार्यक्रम पुणे, भुवनेश्वर, इंदूर, जयपूर अशा चार शहरांमध्ये होणार असून बॉलिवूडची सर्वोत्तम सुमधूर गाणी हिप-हॉपच्या धडकत्या बिटस् वर हे तरुणांमध्ये लोकप्रिय कलाकार सादर करतील.
या आगळ्यावेगळ्या संगीत कार्यक्रमात गेल्या वर्षी ५० हजाराहून अधिक प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. यंदा हा आकडा वाढून संगीताच्या तालावर तरुणाईची पावले थिरकतील असा आयोजकांचा अंदाज आहे. या प्रसंगी या तरुण गायक कलावंतांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
“हिप-हॉप हे सदैव तरुणाईशी निगडित राहील. त्याच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत राहील,” असे रॅपर बादशहा म्हणाला. तर “बॉलिवूड आणि हिप-हॉप फ्युजन यातून चमत्कार घडेल,” असा आशावाद हक्काने व्यक्त केला.
“हिप-हॉप हेच माझे जीवन आहे. त्याने माझ्यात शिस्त बाणवली,” असे रॅपर डी एमसी बोलली. “लोग दिलजले होते है. प्रेक्षक आपले दुःख विसरून खुश राहिले पाहिजे,” असे सांगून त्यांना संगीतातून आनंद लाभावा, अशी भावना अली मर्चंटने व्यक्त केली.