खिलाडी अक्षय कुमार सध्या त्याच्या 'OMG 2' चित्रपटामुळे सतत चर्चेत असतो. काही काळापासून अक्षयचे चित्रपट सतत फ्लॉप होत असले तरी त्याने याआधी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. अक्षय त्याच्या प्रोफेशनल लाईफसोबतच त्याच्या लव्ह लाईफमुळे देखील चर्चेत आहे. खासकरून रवीना टंडनसोबतच्या त्याच्या एंगेजमेंटची बातमी समोर आली होती. असंही म्हटलं जातं की, अक्षय कुमार रवीना टंडनवर जीव ओवाळायचा, पण जर खिलाडीने त्या रात्री चूक केली नसती तर आज रवीना टंडन त्याची पत्नी नसती.
अक्षय कुमार आणि रवीना टंडन 'मोहरा' चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. या चित्रपटात काम करत असतानाच दोघांची मैत्री झाली आणि त्यानंतर प्रेमप्रकरण सुरू झाले. या चित्रपटानंतरही दोघंही अनेक प्रसंगी एकमेकांसोबत स्पॉट झाले होते.
या दोघांच्या प्रेमकथा बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये प्रसिद्ध होत होत्या आणि अशा बातम्या पसरू लागल्या की अक्षय आणि रवीना लवकरच लग्न करू शकतात. दोघांनी मंदिरात एंगेजमेंट केल्याचेही बोलले जात होते, मात्र एका रात्री अक्षयने अशी चूक केली ज्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला.
ज्यावेळी त्यांच्या लग्नाच्या बातम्या मीडियामध्ये येत होत्या, त्यावेळी अक्षय कुमार अभिनेत्री रेखासोबत 'खिलाडियों का खिलाडी'मध्ये काम करत होता अक्षयची रेखासोबतची जवळीक वाढू लागली असेही म्हटले जात होते. रवीनाला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा तिला धक्काच बसला.
, जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एका पार्टीचे आयोजन करण्यात आले तेव्हा परिस्थिती आणखी बिघडली. त्या रात्री अक्षयने पार्टीमध्ये रेखासोबत बराच वेळ घालवला होता, असं म्हटलं जातं. अक्षयचे हे कृत्य रवीनाला त्रासदायक ठरले आणि तिने अक्षयपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्या रात्रीच्या घटनेनंतर रवीना आणि अक्षयचे मार्ग एकमेकांपासून कायमचे वेगळे झाले.
रवीनासोबत ब्रेकअप झाल्यानंतर त्याचे नाव शिल्पा शेट्टीसोबत जोडले गेले आणि त्यानंतर शिल्पा नंतर ट्विंकल खन्ना त्याच्या आयुष्यात आली. अक्षयने ट्विंकलसोबत सेटल होण्याचा निर्णय घेतला आणि दोघांनी 2001 मध्ये लग्न केले. अक्षयच्या लग्नानंतर काही वर्षांनी रवीनाने अनिल थडानीसोबत सात फेरे घेतले.