Close

मिसळ पाव (Misal Pav)


साहित्य : एक कप मोड आलेली मटकी किंवा भिजवलेले वाटाणे, 1 बटाटा, 8-10 कढीपत्त्याची पाने, 2 कांदे, 2-3 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या, 1 टीस्पून आलं-लसूण पेस्ट, प्रत्येकी अर्धा चमचा हळद, जिरे पावडर आणि लाल मिरची पावडर, 1 टीस्पून धणे पावडर, 1 टीस्पून गरम मसाला, 2 टेबलस्पून कापलेली कोथिंबीर, एक कप फरसाण,
2 टेबलस्पून तेल, पाव, चवीनुसार मीठ आणि लिंबाच्या फोडी.
कृती : कांदा बारीक कापून घ्या. कुकरमध्ये तेल गरम करून जिरे, कढीपत्त्याची फोडणी द्या. आलं-लसूण पेस्ट, कापलेली मिरची, गरम मसाला, जिरे पावडर आणि लाल मिरची पावडर टाका. नीट परतून यात, बटाट्याच्या बारीक फोडी, मोड आलेली मटकी वा भिजवलेले वाटाणे घाला. पाणी टाकून झाकण ठेवून शिजवा. सर्व्ह करताना डिशमध्ये रस्सा टाका. त्यावर फरसाण, कापलेला कांदा व कोथिंबीर टाका. लिंबाच्या फोडी लावून पावासह मिसळ सर्व्ह करा.

Share this article