Close

यामी नंतर बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढानेही दिली गुडन्यूज, लवकर होणार आई (Richa Chadha and Ali are expecting their first baby, couple announce pregnancy on Social Media)

बॉलिवूडमधून आणखी एक आनंदाची बातमी येत आहे. यामी गौतम आणि आदित्य धर यांच्यानंतर आता बॉलिवूडमधील आणखी एका लोकप्रिय जोडप्याच्या घरी आनंदाची बातमी येणार आहे. गुड्डू भैय्या अली फजल आणि रिचा चढ्ढा हे देखील लवकरच आई-वडील होणार आहेत. त्यांच्या घरातही पाळणा हलणार आहेत. या जोडप्याने आज सोशल मीडियावर चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

अली फजल आणि रिचा चड्ढा लग्नाच्या दोन वर्षानंतर पालक बनणार आहेत. त्यांनी सोशल मीडियावर अतिशय मजेदार पद्धतीने त्यांच्या गर्भधारणेची घोषणा केली आहे. या जोडप्याने सोशल मीडियावर एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. स्वत:चा एक फोटो शेअर करताना या जोडप्याने लिहिले की, एक लहान हृदयाचा ठोका आमच्या जगातील सर्वात मोठा आवाज बनणार आहे. याशिवाय, त्याने आणखी एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये 1+1=3 लिहिले आहे

या जोडप्याने ही घोषणा करताच, त्यांच्या चाहत्यांनी आनंदाने त्यांच्या गुड्डू भैय्याचे वडील झाल्याबद्दल त्यांचे सतत अभिनंदन करत आहेत आणि त्यांच्यावर खूप प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

अली फजल आणि ऋचा चढ्ढा यांनी 2020 मध्ये लॉकडाऊन दरम्यान लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु कोविडमुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही. यानंतर, 6 ऑक्टोबर 2022 रोजी कुटुंब आणि मित्रांमध्ये भव्य विवाह करण्याचे ठरले. त्यांचा पहिला विवाहपूर्व सोहळा दिल्लीत झाला. त्यानंतर त्यांनी लखनौमध्ये लग्न केले. यानंतर मुंबईत लग्नाचे रिसेप्शनही आयोजित करण्यात आले होते. आता हे जोडपे लग्नाच्या तीन वर्षानंतर आई-वडील होणार आहेत.

Share this article