Close

रुबीना दिलेकची गोड बातमी; दिला जुळ्या मुलींना जन्म (Rubina Dilaik And Abhinav Shukla Finally Welcome Twin Baby Girls)

गेल्या काही दिवसांपासून टेलिव्हिजन अभिनेत्री रुबीना दिलैक इंस्टावरुन वेगवेगळे फोटो शेयर करुन लाईमलाईटमध्ये आली होती. आता रुबीना दिलेकची गोड बातमी आता समोर आल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. रुबीनानं जुळ्या मुलींना जन्म दिला आहे.

टीव्ही मनोरंजन आणि बिग बॉसमध्ये देखील आपल्या परफॉर्मन्सनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या रुबीनाच्या घरी दोन नव्या पाहुण्या आल्या आहेत. चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन तिला मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देखील दिल्या आहेत. खरं तर रुबीनीच्या ट्रेनरनं काही वेळेपूर्वी एक पोस्ट केली होती. त्यात तिला जुळ्या मुली झाल्याची माहिती होती. मात्र काही वेळानं ती पोस्ट डिलीट करण्यात आली होती.

त्याचं झालं असं की, रुबीनाच्या जिम ट्रेनरनं एक पोस्ट केली होती. त्यात रुबीनाला जुळ्या मुली झाल्याचा उल्लेख केला होता. मात्र पुन्हा काही वेळेतच ती पोस्टही डिलीट करण्यात आली. यानंतर नेटकरी कोड्यात पडले की, रुबीनाची ती पोस्ट तिच्याच ट्रेनरनं डिलीट का केली... ती पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मात्र सोशल मीडियावरुन रुबीनावर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहे. गेल्या काही दिवसांपासून रुबीनाच्या इंस्टावरील त्या व्हायरल फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. रुबीना आणि अभिनव शुक्लाच्या त्या पोस्टनं दोन्ही सेलिब्रेटी चर्चेत आले होते.

१६ डिसेंबर रोजी रुबीनाच्या फॅन पेजच्या माध्यमातून एक पोस्ट करण्यात आली होती. त्यात असे म्हटले गेले होते की, रुबीना ही जुळ्या मुलींची आई झाली आहे. मात्र त्यानंतर ती पोस्ट एडिट करण्यात आली. रुबीनाच्या ट्रेनरने ती पोस्ट केल्याचे बोलले जाते. २०१८ मध्ये रुबीना आणि अभिनव शुक्ला यांनी लग्न केले होते. त्या दोघांना बिग बॉसमध्ये पहिल्यांदा पाहिले गेले. बिग बॉसपासून त्यांची केमिस्ट्री हा नेटकऱ्यांच्या आणि चाहत्यांच्या चर्चेचा विषय होता. बिग बॉसच्या त्या पर्वाची रुबीना विजेती होती.

Share this article