'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटानंतर बॉलिवूडचा दबंग सलमान खान पुन्हा एकदा 'टायगर 3' चित्रपटातून पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे, ज्याची चाहतेही आतुरतेने वाट पाहत आहेत. सल्लू मियांचे नाव बॉलिवूडच्या अशा सुपरस्टार्सपैकी एक आहे, ज्याच्या नुसत्या नावानेच चाहते आपोआप थिएटरकडे आकर्षित होतात. अर्थात, सलमानने आपल्या फिल्मी करिअरमध्ये एकापेक्षा एक चित्रपटांमध्ये काम केले आहे, पण त्याच्या आयुष्यात एक असा टप्पा आला जेव्हा सुपरस्टार झाल्यानंतरही सलमान खान बेरोजगार झाला होता. 'मैने प्यार किया' चित्रपटानंतर त्याला अनेक महिने काम मिळाले नव्हते. जाणून घेऊया ही रंजक गोष्ट...
सलमान खान केवळ त्याच्या अभिनयासाठीच नाही तर त्याच्या दिलदारपणासाठी इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहे. त्याचे बहुतेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा पार करतात. भाईजानने 1988 मध्ये आलेल्या 'बीवी हो तो ऐसी' या सिनेमातून करिअरची सुरुवात केली होती, पण 'मैने प्यार किया' हा त्याचा नायक म्हणून पहिला सिनेमा होता, जो ब्लॉकबस्टर ठरला.
'मैने प्यार किया' या चित्रपटात काम केल्यानंतर सलमान खान रातोरात सुपरस्टार बनला होता, या चित्रपटातून सुपरस्टार होऊनही त्याला बराच काळ बेरोजगार राहावे लागले. त्याला चित्रपटही मिळत नव्हते.
याचा खुलासा खुद्द सलमान खानने एका मुलाखतीत केला आहे. 'मैने प्यार किया' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो जवळपास पाच ते सहा महिने बेरोजगार होता, कारण इंडस्ट्रीत कोणीही त्याच्यासोबत काम करण्यास तयार नव्हते. त्यामुळे सलमानलाही आता कधीच काम मिळणार नाही असे वाटू लागले होते.
या चित्रपटानंतर सलमानने खुलासा केला होता की, भाग्यश्रीमुळे आपल्याला काम मिळत नव्हते, कारण इंडस्ट्रीतील प्रत्येकालाच हा चित्रपट भाग्यश्रीमुळेच चालला असे वाटत होते. चित्रपटात मी असाच होतो. या चित्रपटाच्या यशामागे भाग्यश्रीचा मोठा हात आहे असेत सर्वजण कारण मानत होते.
सलमानला हा चित्रपट मिळणे सोपे नव्हते, कारण सलमान खानला आधी नकार देण्यात आला होता, पण नंतर असे काही झाले की हा चित्रपट सलमान खानला मिळाला. भाईजानच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो शेवटचा 'किसी का भाई किसी की जान' मध्ये दिसला होता आणि आता अभिनेता लवकरच कतरिना कैफ सोबत 'टायगर 3' चित्रपटात दिसणार आहे.