साहित्य : 2 वाटी तीळ, दीड वाटी साखर, 3 वाटी तूप.
कृती : तीळ खमंग भाजून त्यांची पूड तयार करा. साखरेमध्ये पाव वाटी पाणी घालून त्याचा एकतारी पाक तयार करून घ्या. त्यात तिळाची पूड घालून चांगली एकजीव करून घ्या. त्यावर गरम तुपाची हळुवार धार सोडा. मिश्रणावर जाळी दिसायला लागल्यावर, हे मिश्रण तुपाचा हात लावलेल्या थाळी वा ट्रेमध्ये ओता. गरम असतानाच त्याचा वड्या पाडून घ्या. नंतर ती थाळी थोडी तिरकी ठेवून जास्तीचे तूप निथळून घ्या.
Link Copied