Entertainment Marathi

‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाची ३०वर्षांनंतरही जादू कायम (Shah Rukh Khan, Kajol’s Dilwale Dulhania Le Jayenge statue to be unveiled at Leicester Square in London)

बॉलिवूडच्या इतिहासातील एक अजरामर प्रेमकथा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (DDLJ) आता अधिक खास बनली आहे. यंदा या चित्रपटाला ३० वर्षे पूर्ण होणार आहेत.

‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट २० ऑक्टोबर १९९५ रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमाची ३० वर्षे पूर्ण झाल्याने या चित्रपटाचा लंडनमध्ये खास गौरव करण्यात येणार आहे. या चित्रपटातील राज आणि सिमरन या जोडीचा आयकॉनिक पोजमध्ये कांस्य पुतळा बनविण्यात येणार आहे. या पुतळ्याचे अनावरण २०२५च्या वसंत ऋतूमध्ये होणार असून, त्याचवेळेस डिडिएलजेच्या ३०व्या वर्धापन दिनाचाही मोठा उत्सव सुरू होईल.

‘हार्ट ऑफ लंडन बिझनेस अलायन्स’ने हा पुतळा उभारण्याची घोषणा केली असून ‘सीन्स इन द स्क्वेअर’ या चित्रपटाच्या ट्रेलमध्ये हा पुतळा बसवण्यात येणार आहे. भारतीय चित्रपटावर आधारित हा पहिलाच पुतळा असणार आहे.

या आधी येथे सुपर –हिरो बॅटमॅन हॅरी पॉटरट लॉरेट अँड हार्डी अशा चित्रपटातील कलाकारांचे पुतळे बनवले आहेत. आता त्यात आपली सर्वांची आवडती जोडी पाहता येणार आहे.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

फिल्म समीक्षा: ये ‘आंखों की गुस्ताखियां’ शायद ही माफ़ हो… (Movie Review: Aankhon Ki Gustaakhiyan)

प्रेम कहानी में एक लड़का होता है, एक लड़की होती है, कभी दोनों हंसते हैं…

July 12, 2025

कहानी- इश्क़ (Short Story- Ishq)

सोमू बोला, "तुमने कहा था उसे मुझ से ज़्यादा प्यार देना. तुम्हारी बात मानता हूं,…

July 12, 2025

फिल्म समीक्षाः ऐसी फिल्मों का भगवान ही ‘मालिक’ है… (Movie Review: Maalik)

अक्सर फिल्म बनाने का उद्देश्य मनोरंजन, कमाई, संदेश, प्रेरणा इत्यादि रहती है. लेकिन जब सारी…

July 11, 2025
© Merisaheli