साहित्य : 4 पांढरे ब्रेड स्लाइसेस, एकतारी पाक 2 ते 3 वाट्या, आटवलेले गोड दूध/रबडी (दीड लिटर दूध आटवून पाऊण लिटर करून, त्यात एक वाटी साखर घाला.)
सारणासाठी साहित्य : खवा 1 वाटी, साखर 1 वाटी, वेलची पूड 1 चिमूट, आंब्याचा रस 1 वाटी.
सजावटीसाठी बारीक कापलेले बदाम.
कृती : आंब्याचा रस, साखर एकत्र करा. मंद आचेवर तो कढईत उकळत ठेवा. मग खवा टाका. वेलची पूड टाका.मिश्रण घट्ट झाले की गॅस बंद करून थंड करून घ्या. सारण तयार झाले. आता ब्रेडच्या कडा कापून घ्या व पूर्ण स्लाइस अख्खेच तळून घ्या. तळलेले स्लाइस गरम शुगर सिरपमध्ये घाला. आता एका मिनिटाने काढून रबडीत बुडवा व काढून प्लेटमध्ये ठेवा. आता सँडविचप्रमाणे रबडीत बुडवलेल्या स्लाइसवर सारण ठेवा व त्यावर स्लाइस ठेवा. या सँडविचचे चार भाग करा. डिशमध्ये ठेवून त्यावर अजून थोडी रबडी टाका व एक ते दोन तास फ्रिजमध्ये ठेवा. आंब्याचे तुकडे व बदामाने गार्निश करुन थंड सर्व्ह करा.
शाही मँगो मलार्ई सँडविच (Shahi Mango Malai Sandwich)
Link Copied