आपल्या दमदार अभिनयाने लाखोंच्या हृदयाची धडकन बनलेला शाहिद कपूरचा लाडका मुलगा झैन ५ वर्षांचा झाला आहे. यानिमित्ताने त्यांची पत्नी मीरा राजपूतने झैनचा एक मोहक आणि कधीही न पाहिलेला फोटो शेअर केला आहे. अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचा मुलगा आणि ज्येष्ठ अभिनेते पंकज कपूर-नीलिमा अझीम यांचा नातू झैन आज ५ वर्षांचा झाला आहे. मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी, आई मीरा राजपूतने लहानग्या झैनसाठी एक गोड नोट देखील शेअर केली आहे. शेअर केलेल्या मोनोक्रोम फोटोमध्ये झैनची साइड पोज दिसत आहे.
या कॅन्डिड फोटोमध्ये तो खूप चांगल्या मूडमध्ये असल्याचं दिसत आहे. मीराने आपल्या नोटमध्ये लिहिले की – साखर, पिझ्झाचे तुकडे आणि सर्व काही चांगले! या करंगळीला चिकटून राहण्यात मला इतका आनंद होईल हे कोणास ठाऊक होत! कुशाग्र मन आणि वेडे हृदय, आयुष्यात पुढे जा माझ्या बाळा, नेहमी चमकत राहा. हे संगीत नेहमी जोरात वाजू दे! 5 व्या वाढदिसानिमित्त शुभेच्छा माझ्या झैनू. मीराच्या अनेक सेलेब फ्रेंड्स आणि फॉलोअर्सनी या फोटोला लाईक आणि कमेंट केल्या आहेत.
वंदना रजवानी शाहिद कपूरचा सावत्र भाऊ इशान खट्टरचे वडील राजेश खट्टर यांच्या पत्नी आहेत. त्यांनीही लहान झैनलाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिले की- वाढदिवसाच्या शुभेच्छा झैन देव तुला आशीर्वाद देवो. या फोटोमध्ये मीराचे चाहते तिच्या मुलाची तुलना शाहिदसोबत करत आहेत.काहीजण म्हणत आहेत की बाप जसा गोंडस आहे तसाच मुलगाही आहे. काही जण झैनला लिटिल शाहिद म्हणून संबोधत आहेत, तर काहींनी लिटल मिस्टर हँडसम असे लिहिले आहे.