रहना है तेरे दिल में पासून मॅडी या नावानं लोकप्रिय झालेल्या आर माधवनची (R Madhavan) लोकप्रियता शिखरावर आहे. त्यानं त्याच्या अभिनयानं आणि वेगळ्या भूमिकांना प्रेक्षकांना नेहमीच दाद देण्यास भाग पाडले आहे. सध्या त्याच्या नव्या शैतान नावाच्या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मॅडीच्या त्या लूकनं चाहत्यांना जिंकून घेतलं आहे. अजय देवगणच्या त्या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. ती एक थ्रिलर फिल्म असून त्यात आर माधवन आणि ज्योतिका यांच्या प्रमुख भूमिका आहेत. काही दिवसांपूर्वी ज्योतिकानं त्या चित्रपटाचे एक पोस्टरही शेयर केले होते. आता निर्मात्यांनी आर माधवनच्या तो लूक शेयर केला आहे.
शैतानच्या माध्यमातून ज्योतिका तब्बल २५ वर्षानंतर बॉलीवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. तिनं यापूर्वी १९७७ मध्ये आलेल्या डोली सजा के रखना या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये काम केले होते. त्यानंतर तिनं तमिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले. तिथं तिनं मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली. २००१ मध्ये तिनं लिटिल जॉन च्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये काम केले होते.
आता जो टीझर व्हायरल झाला आहे त्यात आर माधवनचा व्हाईस ओव्हर ऐकू येतो. त्यात तो म्हणतो, हे जग पूर्णपणे बहिरं आहे पण जेव्हा मी आवाज देतो तेव्हा त्या सगळ्यांना माझं ऐकावं लागतं. मी दिसतो तसा नव्हे तर खूपच भयानक आहे....अशा आशयाचा संवाद माधवन बोलू लागतो. सोशल मीडियावरील त्या टीझरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
अंगावर काटे आणणारा हा शैतानचा टीझर असून त्यात अजय देवगण आणि ज्योतिकाचे काही प्रसंग आहेत. ज्यात ते त्यांच्या समोर येणाऱ्या अनेक प्रसंगांना धाडसानं सामोरे जाताना दिसत आहे. हा चित्रपट येत्या वर्षी ८ मार्च रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.