Close

पाहा शनाया कपूरचा देसी बार्बी लूक, चाहतेही झाले फिदा तर कोणी केली तिखट कमेंट (Shanaya Kapoor Decks Up As ‘Desi Barbie’ In Pink Anarkali Suit)

बॉलिवूड अभिनेता संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी शनाया कपूरचे बार्बी वाइब्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गुलाबी रंगाच्या अनारकली सूटमध्ये शनाया बार्बी डॉलसारखी दिसत आहे.

अलीकडेच शनाया कपूर तिच्या एका मैत्रिणीच्या प्री-वेडिंग पार्टीत सहभागी झाली होती. मैत्रिणीच्या प्री-वेडिंग पार्टीत सहभागी झालेली शनाया कपूर देसी बार्बी लूकमध्ये दिसली. अभिनेत्रीने देसी बार्बीचे हे फोटो इंटरनेटवर शेअर केले आहेत.

हे जबरदस्त फोटो पोस्ट करत शनायाने कॅप्शनमध्ये लिहिले- 'देसी बार्बी...' शनाया गुलाबी रंगाच्या नक्षीदार अनारकली सूटमध्ये खूपच क्यूट दिसत आहे.

अभिनेत्रीने पायात शायनी शूज घातले आहेत. अॅक्सेसरीजच्या बाबतीत, फक्त शनायाने तिचा एथनिक लुक गोल्ड आणि पर्ल इयरिंग्ससह पूर्ण केला. शनायाचे काही सोलो फोटोही आहेत. पार्श्वभूमीत फुलांची सजावट केलेली दिसते.

काही फोटोंमध्ये तिची चुलत बहीण खुशी कपूर आणि मित्रही सोबत दिसत आहेत. शनायाच्या या एथनिक लूकवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. कोणी तिला देसी कुडी म्हणत आहेत, तर कोणी बार्बीची काळजी कोण घेतं, ही देसी कुडी मस्त आहे असे लिहिलं आहे.

एका चाहत्याने तिला राष्ट्रीय क्रश अशी उपमा दिली आहे. मात्र एका युजरने नकारात्म कमेंटही केली. त्याने लिहिले की, एक अशी देसी बार्बी जी फक्त इंग्रजीत बोलते. आणि हिंदी किंवा इतर भाषीयांना अशिक्षित समजते.

शनायाच्या या फोटोंना केवळ चाहतेच नाही तर सेलिब्रिटीही खूप लाईक आणि कमेंट करत आहेत शनाया कपूर साऊथचा सुपरस्टार मोहनलालच्या पॅन इंडिया चित्रपट वृषभामधून अभिनय करिअरची सुरुवात करत आहे.

Share this article