Close

शांघाय व्हेजिटेबल्स (Shanghai Vegetable)

साहित्य : 2 कप उकडून मोठ्या आकारात चिरलेल्या मिश्र भाज्या (फ्लॉवर, ब्रोकोली, बेबीकॉर्न, मशरूम, फरसबी, गाजर इत्यादी), पाऊण कप मोठ्या आकारात चिरलेली लाल, पिवळी व हिरवी सिमला मिरची, 2 टेबलस्पून मैदा, दीड टेबलस्पून कॉर्नफ्लोअर (थोड्या पाण्यात घोळून), प्रत्येकी 1 टीस्पून शेजवान सॉस व गार्लिक चिली सॉस, प्रत्येकी दीड टीस्पून बारीक चिरलेले लसूण, आले व सेलेरी, प्रत्येकी दीड टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा व हिरवी मिरची, प्रत्येकी 2 चिमूट अजिनोमोटो, काळी मिरी पूड व साखर, स्वादानुसार मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती : मिश्र भाज्यांमध्ये मीठ, अजिनोमोटो, काळी मिरी पूड, साखर, कॉर्नफ्लोअरचे मिश्रण आणि मैदा घालून एकजीव मिश्रण तयार करा. या सर्व भाज्या तपकिरी रंगावर गरम तेलात तळून घ्या. दुसर्‍या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोठ्या आचेवर आले, लसूण, कांदा, सेलेरी आणि हिरवी मिरची मिनिटभर परतवा. त्यात सर्व सॉस व थोडे पाणी एकत्र करा. नंतर तळलेल्या मिश्र भाज्या, कॉर्नफ्लोअरचे मिश्रण व आवश्यकतेनुसार पाणी एकत्र करून ग्रेव्ही दाट होईपर्यंत शिजवा. शेवटी कांद्याच्या
पातीने सजवा.

Share this article