'खतरों के खिलाडी १३' या शोचं शूटिंग सध्या अंतिम टप्प्यावर आहे. अशातच खतरों के खिलाडी च्या सेटवरून मोठी बातमी समोर आलीय. त्यामुळे चाहत्यांना काळजी वाटून राहिली आहे.
'खतरों के खिलाडी १३' मध्ये सहभागी असलेला अन् या शो मधील पहिला फायनलिस्ट बनलेला मराठमोळा शिव ठाकरे आता स्टंटदरम्यान गंभीर जखमी झाला आहे. शिवला 'खतरों के खिलाडी १३' मध्ये दुखापत झाल्याचं समोर आलंय.
'खतरों के खिलाडी १३' च्या लेटेस्ट व्हिडिओमध्ये शिव ठाकरे हाताला झालेली जखम दाखवताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्याने आपल्या बोटांना टाके घातल्याचे दाखवले आहे. शिव ठाकरेंनी बोटांचा क्लोजअप दाखवला आहे, जिथे अनेक टाके दिसत आहेत.
हा व्हिडिओ पाहून शिवचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत आणि अनेकांनी त्याला 'खतरों के खिलाडी १३' चा विजेता म्हणायला सुरुवात केली आहे. याशिवाय शिवचे कर्तृत्व अन् धाडस पाहून चाहते त्याचे कौतुक करत आहेत.
अलिकडेच 'खतरों के खिलाडी १३' या शो मध्ये सहभागी असलेली आणि 'बिग बॉस 16'मध्ये दिसलेली अर्चना गौतम देखील 'खतरों के खिलाडी १३' मध्येही जखमी झाली होती. अर्चना गौतमला हनुवटीच्या खाली मानेच्या अगदी वरती दुखापत झाली होती, तिलाही टाके घालावे लागले होते.
'खतरों के खिलाडी १३' च्या सीझनमध्ये शिव ठाकरे आणि अर्चना गौतम व्यतिरिक्त डेझी शाह, शीझान खान, ऐश्वर्या शर्मा, अंजली आनंद, अंजुम फकीह, रुही चतुर्वेदी आणि अनेक स्टार्स रोहित शेट्टीच्या शोची मजा द्विगुणीत करण्यासाठी येत आहेत.
शोच्या शूटिंगदरम्यान अनेक जण जखमी झाल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. याआधी शो मध्ये सहभागी झालेल्या अनेक स्टार्सने माघार घेतलीय.