दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांच्याकडे २१ जून रोजी पाळणा हलला. पण त्यांचा प्रवास तितकासा सोपा नव्हता. प्री मॅच्युर डिलेव्हरीमुळे लहान मुलाला इन्क्युबेटरमध्ये ठेवावे लागले. तो बरा झाल्यानंतर दीपिका आणि बाळाचे घरी भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर बाळाचे नामकरण करून त्याचे नाव रुहान ठेवण्यात आले.
पण रुहान आणि दीपिकाची प्रकृती पुन्हा बिघडली आणि दीपिकाला मध्यरात्री रुग्णालयात दाखल करावे लागले. शोएब आणि दीपिका यूट्यूब व्लॉग्सद्वारे चाहत्यांशी जोडले गेले, परंतु प्रकृती ठिक नसल्यामुळे त्यांचे व्लॉगही बरेच दिवस दिसले नाहीत. आता दोघांनीही व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले की, केवळ दीपिका आणि रुहानच नाही तर घरातील अनेकांना व्हायरल इन्फेक्शनमुळे त्रास होत आहे.
दीपिकासाठी शोएबने सांगितले की, तब्येत बिघडल्यामुळे ती मध्यरात्री जागायची आणि तासनतास रडायची. तिला घसा खवखवणे आणि वेदना होत असल्याने तिला हॉस्पिटलमध्ये न्यावे लागले.
शोएब पुडे म्हणाला की, माझी आई आणि घरातील इतर सदस्यांनाही फ्लूची लागण झाली होती. हवामान खराब आहे आणि फ्लू सर्वत्र पसरला आहे, परंतु आता सर्वांना बरे वाटत आहे . शोएबने चाहत्यांची माफीही मागितली की तो अनेक दिवस व्हिडिओ बनवू शकला नाही आणि चाहत्यांशी कनेक्ट होऊ शकला नाही.
दीपिकाने सांगितले की, संसर्गामुळे तिचा घसा इतका दुखत होता की ती असह्य झाली होती, पण आता ती बरी आहे आणि तिच्या घशातील दुखणेही कमी झाले आहे.
दिपिकाच्या बाळालाही व्हायरल झाले होते.