गेल्या वर्षभरात अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले, अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या जोडीदारासोबत लग्नगाठ बांधली तर अनेकांनी आपल्या प्रेमाची कबुली देत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला. आता या कलाकारांच्या यादीत आणखी एका अभिनेत्याचं नाव जोडलं जाणार आहे. लोकप्रिय अभिनेते सुनिल तावडे यांचा मुलगा शुभंकर तावडे याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.
शुभंकर हा स्वतः अभिनेता असून त्याची होणारी पत्नी ही लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लूएंझर आहे. समीक्षा टक्के असं तिचं नाव आहे. शुभंकरने तिच्यासोबतचा फोटो शेअर करत, ‘तू आहेस. जेव्हा आनंद सांत्वनाची जागा घेतं.’ अशी फोटोला कॅप्शन दिली आहे. शुभंकरने ही आनंदाची बातमी दिल्यानंतर चाहते त्याच्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
समीक्षा सोशल मीडियावर कॉमेडी, लाईफस्टाइल, फॅशन आणि स्पोर्ट्स या वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळे व्हिडिओ शेअर करत असते. तिने शेअर केलेल्या रील्सला तुफान लाईक आणि कमेंट्स मिळतात. याशिवाय तिने अनेक भारतीय क्रिकेटर्सच्या मुलाखती घेतल्या आहेत. ती स्वतः एक उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू आहे. तर शुभंकरने फ्रेशर्स या मालिकेतून त्याच्या अभिनयातील कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर तो डबलसीट, कागर, वेड, कन्नी या चित्रपटांमध्ये दिसला. त्याची काळे धंदे ही वेबसीरिजही खूप गाजली.