साहित्य : 4-5 लसूण पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आले, 2 कांदे, 2 हिरवी सिमला मिरची, 400 मि.ली. व्हेजिटेबल स्टॉक, 2-3 टीस्पून सोया सॉस, 1 टेबलस्पून कॉर्न फ्लोर, 150 ग्रॅम पनीर (चौकोनी आकारात कापलेले), अर्धा टीस्पून सफेद मिरी पावडर, 1 टेबलस्पून बारीक कापलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ.
सिझलिंगसाठी साहित्य : 100 ग्रॅम कोबी, 2 कांदे (भाजलेले), 1 टोमॅटो (भाजलेले), 1 टेबलस्पून शिजलेला मटार, 2 टेबलस्पून गाजरचे काप, 2 कप शिजलेले नूडल्स, 2 कप घरी बनवलेले फ्रेंच फ्राइज, 2 टेबलस्पून साधारण शिजलेली पालकची पाने.
कृती : कढईत तेल गरम करा. यात बारीक चिरलेला लसूण, हिरवी मिरची आणि आले टाकून परतून घ्या. कांदा व सिमला मिरची चौकोनी आकारात कापा. कढईत ते टाकून परतून घ्या. यात व्हेजिटेबल स्टॉक टाकून थोडा वेळ शिजवून घ्या. यात सोया सॉस टाका. थोड्या वेळाने कॉर्नफ्लोर पाण्यात मिसळून ती पेस्ट वरील मिश्रणात टाका. नंतर कापलेले पनीर टाकून थोडा वेळ शिजवून घ्या. सफेद मिरी पावडर टाका व कापलेली कोथिंबीर टाकून आच बंद करा. आता सिझलर प्लेट गरम करून घ्या. या प्लेटवर कापलेला कोबी पसरवून घ्या. आत शिजलेला कांदा आणि टोमॅटो एका बाजूला ठेवा. बटर गरम करून मटार आणि गाजराचे तुकडे साधारण परतून घ्या. नूडल्स, गाजराचे तुकडे, मटार आणि फे्रंच फ्राइज सिझलिंग प्लेटवर व्यवस्थित पसरवून घ्या. तयार पनीर, सोया चिली सॉस या नूडल्सवर टाका. गरमागरम सिझलींग सर्व्ह करा.
सिझलिंग पनीर सोया चिली (Sizzling Paneer Soya Chilli)
Link Copied