सोनम कपूरने अलीकडेच तिचा दीर अनंत आहुजाला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अभिनेत्रीने तिचा लहान मुलगा वायुची एक सुंदर झलकही दाखवली आहे.
गेल्या वर्षीच सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या घरात पाळणा हलला. अभिनेत्रीने मुलगा वायू कपूरला जन्म दिला. तिने अद्याप वायुचा चेहरा जगासमोर उघड केलेला नाही, परंतु कधीकधी सोनम कपूर तिच्या कौटुंबिक फोटोंमध्ये वायुची गोंडस झलक दाखवते.
अभिनेत्री सोनम कपूरने तिच्या दीराला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना इंस्टाग्रामवर वायूची एक गोंडस झलक दाखवली आहे. वायू फोटोत आपल्या काकांच्या मांडीवर बसला आहे आणि गोष्टीच्या पुस्तकाकडे लक्षपूर्वक पाहत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये बर्थडे बॉय अनंत काळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसत आहे, तर वायु पिवळ्या टी-शर्ट आणि पांढऱ्या सॉक्समध्ये खूपच क्यूट दिसत आहे.
हे फोटो शेअर करताना, सोनम कपूरने कॅप्शनमध्ये एक गोड नोट देखील लिहिली - "सर्वोत्तम भावोजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा... लव्ह यू @ase_msb मला आशा आहे की वायु तुमच्याकडून कुतूहल, दयाळूपणा आणि सहानुभूतीतून शिकेल... खूप प्रेम."..."
सोनम कपूरने शेअर केलेल्या या फोटोंवर तिचे पती आनंद आहुजासह तिचे चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.