Close

पद्मभूषण सुधा मूर्ती यांच्या कथा ॲनिमेटेड सिरीजमध्ये गुंफणारी मालिका ‘स्टोरी टाइम विथ सुधा अम्मा’ (‘Story Time With Sudha Amma’ Is An Animated Series Based On The Stories Of Padmabhushan Sudha Murthy)

सर्वांसाठी उपलब्ध होईल अशी छान आशय निर्मिती करण्याचे उद्दीष्ट्य डोळ्यासमोर ठेवणाऱ्या मूर्ती मीडिया या कंटेट प्रोडक्शन हाऊस अर्थात आशय निर्मिती गृहाने तयार केलेल्या ‘स्टोरी टाईम विथ सुधा अम्मा’ या अॅनिमेटेड सिरीजचे लाँचिंग अत्यंत दिमाखदार आणि देखण्या सोहळ्यात पार पडले. ही सिरीज एका युट्युब चॅनेलवर प्रसारित केली जाणार आहे. या कार्यक्रमाला आबालवुद्धांना आवडतील अशा सुंदर गोष्टी रचणाऱ्या, प्रसिद्ध लेखिका आणि पद्मभूषण पुरस्कार विजेत्या सुधा मूर्ती, या सिरीजसाठी अॅनिमेशनची निर्मिती करणाऱ्या 'कॉसमॉस माया'च्या सीईओ मेघा टाटा, प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी आणि प्रसिद्ध संगीतकार शांतनू मोईत्रा यांनी उपस्थिती लावली होती.

शिक्षणासोबतच मुलांची करमणूकही व्हावी हा मूर्ती मीडियाचा प्रयत्न राहिलेला आहे. ‘स्टोरी टाईम विथ सुधा अम्मा’ द्वारे लहान मुलांना सकारात्मक पद्धतीने माध्यमांचा आनंद घेता यावा हा प्रयत्न राहिलेला आहे. ‘स्टोरी टाईम विथ सुधा अम्मा’ मध्ये लहान मुलांचे मनोरंजन तर होतेच शिवाय त्यांना अनेक गोष्टी शिकताही येतात. गीतकार प्रसून जोशी आणि संगीतकार शांतनू मोईत्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्टोरी टाईम विथ सुधा अम्मा’च्या थीम साँगचे या कार्यक्रमात सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमात, सुधा मूर्ती यांनी आपल्या आयुष्यातील काही घटना सांगताना गोष्टी सांगण्याचे कसब किती महत्त्वाचे आहे आणि दुर्गम भागातील लहान मुलांनादेखील या गोष्टी पोहचवणे किती महत्त्वाचे आहे हे सांगितले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना सुधा मूर्ती म्हणाल्या की, "गोष्टी सांगणे ही एक कला आहे, ज्यामुळे लहान मुलेच नाही तर मोठी माणसेही ती लक्ष देऊन ऐकतात. ‘स्टोरी टाईम विथ सुधा अम्मा’ ही अपर्णा कृष्णन यांची कल्पना आहे. मूर्ती मीडियाने गोष्टी अॅमिनेशनच्या माध्यमातून जिवंत करण्याचा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. अपर्णा यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानत असून माझ्या कथा मीच पाहणे यासारखा दुसरा आनंद नाही. कथांमधली पात्रं डोळ्यासमोर जिवंत होत असलेली पाहून मला फार छान वाटतंय."

मूर्ती मीडियाच्या अध्यक्षा अपर्णा कृष्णन यांनी यावेळी बोलताना म्हटले की, "मूर्ती मीडियाशी निगडीत आम्हा सर्वांसाठी आजचा दिवस हा खरंच खूप मोठा दिवस आहे. आम्ही नुकतेच एक युट्युब चॅनेल सुरू केले असून याचा उद्देश हा प्रेक्षकांना आवडेल असा, माहितीपूर्ण आणि स्वदेशी आशय निर्माण करणे हा आहे."

कॉसमॉस मायाच्या सीईओ मेघा टाटा यांनी यावेळी बोलताना म्हटले की,  “श्रीमती सुधा मुर्ती यांनी सांगितलेल्या गोष्टी अॅनिमेशनद्वारे जिवंत करताना आणि त्या अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचवताना आम्हाला आनंद होत आहे. मी प्रसून जोशी आणि शांतनू मोईत्रा यांचे आभार मानते कारण त्यांनी संगीताच्या माध्यमातून या गोष्टींचे सार गाण्यातून खूप छानरित्या सांगितले आहे.”

गीतकार प्रसून जोशी यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना म्हटले की, "या अप्रतिम कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे. लहान मुलांसाठी गाणं तयार करण्याची अशाप्रकारची संधी मला परत कधी मिळेल याचा मी विचार करतोय. या गोष्टी ज्यांनी सांगितल्या त्या श्रीमती मुर्ती यांच्या कथांमध्ये खूप निरागसपणा आणि गोडवा आहे. मला खात्री आहे या कथा आणि या गाण्यावर प्रेक्षक भरभरून प्रेम करतील."

प्रसिद्ध संगीतकार शांतनू मोईत्रा म्हणाले की,"हे गाणं लहान मुलांसाठी असल्याने ते बच्चे कंपनीला आवडेल आणि त्याचवेळी या गाण्याचा आत्मा हरवणार नाही याची काळजी घेणं हे गरजेचं होतं. श्रीमती सुधा मूर्ती यांच्या गोष्टींवर आधारीत असलेल्या या सिरीजसाठी गाण्यावर काम करण्याची मला संधी मिळाल्याने मी फारच उत्साही होतो. मला खात्री आहे ती हे गाणं बच्चे कंपनीसाठी एक प्रेरणादायी गाणे ठरेल."

https://youtu.be/tfLOv4xGalA?si=Hk5MolMcW3EK59nF

मूर्ती मीडियाच्या प्रमुख श्रीमती अपर्णा कृष्णन या श्रीमती सुधा मूर्ती आणि श्री नारायण मूर्ती यांच्या सून आहेत. डार्टमाउथ कॉलेजमध्ये इकॉनॉमिक्सचे शिक्षण घेतलेल्या अपर्णा यांनी यापूर्वी मॅकिन्से अँड कंपनी, सेक्वॉइया कॅपिटल आणि सोरोको इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम केले आहे. प्राणी कल्याण, निसर्ग संवर्धन आणि शिक्षण हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत. या सगळ्या विषयांना जोडणाऱ्या विविध प्रकल्पांवर श्रीमती अपर्णा कृष्णन या काम करत आहेत.

Share this article