द कपिल शर्मा शोमध्ये दिसलेली कॉमेडियन सुगंधा मिश्रा आई होणार आहे. सुगंधाने नुकतेच तिच्या मॅटर्निटी फोटो शेअर करून तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. आता सुगंधाने तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना बेबी मूनची अतिशय गोंडस छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यामध्ये तिचा पती संकेत भोसले तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे.
गायिका आणि कॉमेडियन सुगंधा मिश्राने 15 ऑक्टोबरला ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली. तेव्हापासून चाहतेही खूप उत्सुक आहेत.
सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले आईबाबा होणार आहे. अशा परिस्थितीत हे जोडपे बेबीमूनसाठी गोव्याला गेले आहे, तिथून सुगंधाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मॅटर्निटी शूटचे काही फोटो शेअर केले आहेत.
संकेत कधी सुगंधावर प्रेमाचा वर्षाव करताना तर कधी तिच्या बेबी बंपला किस करताना दिसत आहे. फोटो पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की आई-वडील झाल्यामुळे दोघेही किती आनंदी आहेत.
सुगंधाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती बीचवर दिसत आहे. फोटोत संकेत आनंदाने उड्या मारताना दिसत आहे, तर सुगंधा त्याच्याकडे प्रेमाने पाहत आहे.
तिच्या लूकबद्दल सांगायचे तर, अभिने निळ्या रंगाच्या मिडी ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे आणि पूर्ण आत्मविश्वासाने तिचा बेबी बंप दाखवत आहे. संकेत पांढरा शर्ट आणि डेनिम शॉर्ट्समध्ये देखणा दिसत होता.
सुगंधा मिश्रा यांनी कॉमेडियन, अभिनेता आणि डॉक्टर संकेत भोसलेशी २६ एप्रिल २०२१ रोजी लग्न केले. आता लग्नाच्या अडीच वर्षानंतर हे जोडपे त्यांच्या पहिल्या अपत्याचं स्वागत करणार आहे.
शुभम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत 'हॅशटॅग तदेव लग्नम्' हा सिनेमा येत्या २० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार…
'मेट्रो इन दिनों' और 'इमरजेंसी' में अनुपम खेर अभिनय की एक अलग ऊंचाई को छूते…
अॅमेझॉन एमएक्स प्लेयर या अॅमेझॉनच्या विनामूल्य व्हीडिओ स्ट्रीमिंग सेवेने आज आगामी प्रेम-नाट्य मालिकेसाठी अधिकृत ट्रेलरचे…
दो दिन पहले ही कुंडली भाग्य (kundali bhagya) की प्रीता श्रद्धा आर्या (Shraddha Arya) ने…
कमरे में केसरिया किरणों के शुभागमन से पता चला कि रात बीत चुकी है. रातभर…
हिमेश रेशमियाचे वडील आणि प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक विपिन रेशमिया यांचे निधन झाले आहे. ते 87…