सुपरस्टार शाहरुख खान आणि इंटेरिअर डिझायनर गौरी खान यांची मुलगी सुहाना खान सध्या बॉलिवूडमधील लोकप्रिय स्टारकिड आहे. झोया अख्तर दिग्दर्शित द आर्चीज कॉमिक्सवर आधारित चित्रपटाद्वारे ती आपल्या अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.
'द आर्चीज' असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर येणार असून त्याचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. आता सुहाना खानशी संबंधित एक खास गोष्ट समोर आली आहे. तिचा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तिने करोडोंची मालमत्ता खरेदी केली आहे.
'हिंदुस्तान टाइम्स'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सुहाना खानने अलीबागच्या थल गावात एक शेत जमीन विकत घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्टार किडने १.५ एकर शेतजमीन आणि त्यावर २,२१८ चौरस फूट इमारत तब्बल १२.१९ कोटी रुपयांना विकत घेतली आहे. सुहाना खानने ७७.४६ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्कही भरल्याचे म्हटले आहे. ही जमीन आता देजा-वू फार्म्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नावावर नोंदवण्यात आली आहे, ज्याचे नाव गौरी खानची आई आणि बहीण सविता छिब्बर आणि नमिता छिब्बर यांच्या नावावर आहे.
अलिबागमध्ये घर आणि जमीन विकत घेणार्या मुंबईतील अनेक अभिनेत्रींपैकी सुहाना खान एक बनली आहे. याशिवाय जूही चावलाने ही आपल्या मालमत्तेचे शेतीत रूपांतर केले आहे, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि अनुष्का शर्मा यांनीसुद्धा येथे जमीनी खरेदी केल्या आहेत.