स्वीस रोल
साहित्य : 3 अंडी, अर्धा कप व्हॅनिला इसेन्स, 100 ग्रॅम कॅस्टर शुगर, 75 ग्रॅम मैदा, 3 टेबलस्पून व्हॅनिला जॅम, पाव कप आयसिंग शुगर.
कृती : स्वीस रोल टीनला बटर पेपर लावून घ्या. ओव्हन 210 डिग्री सेल्सियसला गरम करून घ्या. अंडी फेटून घ्या.
यात व्हॅनिला इसेन्स आणि कॅस्टर शुगर मिसळा. मिश्रण चांगले फेटून घ्या. यामुळे ते अधिक हलके होईल आणि फुगेल. तयार टिनमध्ये हे मिश्रण टाका आणि 8-10 मिनिटे बेक करा. केक तयार करून हळूहळू बटर पेपर काढा. तयार केकवर व्हॅनिला जॅम लावा आणि केक रोल करा. त्यावर आयसिंग शुगर भुरभुरवा.
Link Copied