Close

पोपटलालचे लग्नाचे स्वप्न पूर्ण होणार; चढणार बोहल्यावर… (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: Will Popatlal finally get married?)

(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: Will Popatlal finally get married?)

छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमध्ये वेगवेगळे ट्वीस्ट येत असतात. या शोमध्ये आता एका अभिनेत्रीनं एन्ट्री केली आहे. या अभिनेत्रीची आणि पोपटलालची लव्ह स्टोरी तारक मेहता या शोमध्ये दाखवण्यात आली आहे.

पोपटलाल अनोखीसोबत लग्न करणार?

तारक मेहता शोमध्ये पोपटलालचे लग्नाचे स्वप्न पूर्ण होणार आहे, असं वाटत आहे. कारण आता या तारक मेहता या मालिकेमध्ये एका अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. अभिनेत्री पूजा शर्माने शोमध्ये एन्ट्री केली आहे. या शोमध्ये पूजा एक कॅमिओ करणार असल्याचे म्हटलं जात आहे. पूजानं या मालिकेत अनोखी ही भूमिका साकारली आहे. अनोखी आणि पोपटलालच्या पहिल्या भेटीचा प्रोमो व्हायरल झाला आहे.

प्रोमोमध्ये दिसत आहे की, पोपटलाल पहिल्या नजरेत अनोखीच्या प्रेमात पडतो. हा प्रोमो व्हायरल झाल्यानंतर आता प्रेक्षक या मालिकेच्या आगामी एपिसोडची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

पूजाने चार्टर्ड अकाउंटंटचे शिक्षण घेतले आहे. पूजाने अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. पूजा दस जून की रात, छोटी सरदारनी यांसारख्या अनेक शोमध्ये दिसली होती. आता पूजानं 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत एन्ट्री केली आहे.

एका मुलाखतीमध्ये पूजानं 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेबद्दल सांगितलं, "मला या मालिकेच्या निर्मात्यांचा फोन आला आणि त्यांनी मला या भूमिकेची ऑफर दिली.  मी अशा भूमिकांना नकार देते पण हा इतका लोकप्रिय टीव्ही शो आहे, म्हणून मी भूमिकेला लगेच होकार दिला. मला या शोमध्ये फक्त ६ भागांसाठी कास्ट करण्यात आले आहे."

पोपटलालच्या लग्नाचा ट्रॅक 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमध्ये अनेकदा दिसला आहे. आता या कार्यक्रमाचे निर्माते पुन्हा एकदा हा ट्रॅक शोमध्ये आणत आहेत.

Share this article