करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा लाडका तैमूर सात वर्षांचा झाला आहे. काल म्हणजेच 20 डिसेंबर रोजी, करीना आणि सैफने तैमूरचा वाढदिवस साजरा केला, ज्यांचे फोटो आता समोर आले आहेत
करीना कपूर आणि सैफ अली सध्या पतौडी पॅलेसमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत. तैमूरचा वाढदिवस पतौडी पॅलेसमध्ये अगदी साध्या पद्धतीने साजरा केला, त्यातील काही छायाचित्रे सबा पतौडी आणि मावशी करिश्मा कपूर यांनी इंस्टाग्राम हँडलवर शेअर केली आहेत.
वाढदिवशी तैमूर वडील सैफसोबत मॅचिंग होताना दिसत आहे. तैमूरने गुलाबी रंगाचा शर्ट आणि निळा डेनिम परिधान केला आहे. डोक्यावर कॅप घातलेला करिनाचा मुलगा खूपच गोंडस दिसत आहे. सैफही गुलाबी शर्ट आणि निळ्या डेनिममध्ये दिसत आहे. या दोघांचा फोटो पाहून यूजर्स म्हणत आहेत की तैमूर त्याच्या वडिलांची खरी कॉपी दिसत आहे.
मोठा भाऊ तैमूरच्या वाढदिवशी जेह देखील खूप गोंडस दिसत होता आणि त्याने खूप मजा केली. या फोटोमध्ये तैमूर आणि जेह कॉटन कँडी खाताना दिसत आहेत.
या फोटोत सैफ अली खान, तैमूर आणि जेह हे तिन्ही पतौडी मुलं एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत आणि तिघेही एकत्र खूप क्यूट दिसत आहेत.
आत्या सबाने बर्थडे सेलिब्रेशनचे हे फोटो शेअर केले आहेत आणि कॅप्शनमध्ये छोट्या नवाबवर खूप प्रेमाचा वर्षाव करत तिने लिहिले आहे की, माझ्या प्रेमाला ७व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी प्रार्थना करते की तू आयुष्यात सर्वोत्तम कामगिरी कर. एक दिवस तू खूप चांगली व्यक्ती होशील. तुझ्यावर नेहमीच प्रेम असेल.
तैमूरच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला करिश्मा कपूरही तिच्या मुलासोबत हजर होती. तिने सोशल मीडियावर वाढदिवसाचे अनेक फोटोही शेअर केले आहेत. तैमूरच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण पतौडी पॅलेस अतिशय सुंदर पद्धतीने सजवण्यात आल्याचे तुम्ही फोटोत पाहू शकता.
करिश्माने तैमूरच्या वाढदिवसाच्या केकची झलकही शेअर केली आहे. तैमूरच्या वाढदिवसाचा केक फुटबॉल थीमवर बनवण्यात आला होता.
पण आई करीना कपूरने सर्व लाइमलाइट चोरले. मुलाच्या वाढदिवसाला करीना रंगीबेरंगी शर्ट आणि डेनिम परिधान केलेल्या अतिशय फंकी लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
आता चाहत्यांनी तैमूरच्या या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या फोटोंवर खूप प्रेम केले आहे आणि ते तैमूर आणि जेहच्या गोंडसपणाच्या प्रेमात पडत आहेत.