Close

तवा केक (Tawa Cake)

तवा केक


साहित्य : 1 कप मूग डाळ (रात्रभर भिजवलेली), 1 टीस्पून ठेचलेली हिरवी मिरची, 1 टीस्पून किसलेले आले, चवीनुसार मीठ.
टॉपिंगसाठी : अर्धा कप किसलेले चीज, 2 कांदे (पातळ चकत्या करून), 1 टीस्पून लाल मिरची पूड, अर्धा टीस्पून चाट मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ.
कृती : डाळीतील पाणी पूर्णतः निथळून, वाटून घ्या. त्यात हिरवी मिरची व आल्याचा कीस घालून एकजीव करा. नॉनस्टिक पॅनवर डाळीचे मिश्रण पसरवून त्यावर कांद्याच्या चकत्या लावा. त्यावर मिरची पूड व चाट मसाला भुरभुरा. तवा केक दोन्ही बाजूंनी चांगला शेकून घ्या. गरम असतानाच त्यावर किसलेले चीज घालून सर्व्ह करा.

Share this article