Close

टोफू इन ब्लॅक बिन सॉस (Tofu In Black Bean Sauce)


साहित्य : 2 टेबलस्पून तेल, 3 किसलेल्या लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आले बारीक चिरलेले, 1 टीस्पून फरमंटेड ब्लॅक बिन्स (मिठाच्या पाण्यात भिजवून, नंतर जाडसर चिरलेले, बाजारात उपलब्ध), 2-3 बारीक चिरलेल्या कांद्याच्या पाती, 1 टेबलस्पून ब्लॅक बिन्स सॉस, 1 कप व्हेजिटेबल स्टॉक, 2 ब्लॉक टोफू (पाऊण इंचाचे तुकडे करून तळलेले), 1 टेबलस्पून तिळाचे तेल, स्वादानुसार मीठ.
कृती : कढईमध्ये तेल गरम करून त्यात आले-लसूण घालून सुगंध येईपर्यंत परतवा. त्यात ब्लॅक बिन्स व कांद्याच्या पाती घालून 10 सेकंद परतवा. नंतर ब्लॅक बिन सॉस व व्हेजिटेबल स्टॉक घालून व्यवस्थित एकत्र करा. त्यात टोफू व मीठ घालून मंद आचेवर 20 मिनिटे शिजत ठेवा. नंतर तिळाचे तेल घालून आच बंद करा.

Share this article