टोकरी बनविण्यासाठी साहित्य : 1 कप मैदा, अर्धी वाटी गव्हाचे पीठ, मीठ, तळण्यासाठी तेल.
चाट बनविण्यासाठी साहित्य : 2 बटाटे, मोड आलेले मूग, 1 टीस्पून जिरे, प्रत्येकी 1 टीस्पून आमचूर पावडर, लाल मिरची पावडर, 1 टीस्पून लिंबाचा रस, अर्धी वाटी कापलेली कोथिंबीर, थोडासा कापलेला पुदिना, हिरवी चटणी, चिंचेची गोड चटणी.
कृती : मैदा, गव्हाचे पीठ आणि मीठ एकत्र करा. त्यात 1 टीस्पून गरम तेल टाकून पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या. हे पंधरा मिनिटे तसेच ठेवा. चाट बनविण्यासाठी बटाटे शिजवून त्याच्या फोडी कापा. कढईत तेल गरम करून यात जिर्याची फोडणी द्या. बटाट्याच्या फोडी यात टाकून परतून घ्या. यात मोड आलेले मूग, आमचूर पावडर, चाट मसाला, थोडीशी लाल मिरची पावडर व मीठ टाका. चांगले परतून घ्या. सगळ्यात शेवटी कापलेली कोथिंबीर व पुदिन्याची पाने टाका. आच बंद करून लिंबाचा रस टाका व एकजीव करा. मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करा. वाटीमध्ये एक गोळा ठेवून त्याला वाटीच्या आतील बाजूने वाटीचा आकार द्या. ही वाटी कढईतील गरम तेलात टाका. वाटी गरम झाल्यावर मैद्याची वाटी हळूच सुटते. ही वाटी तळून घ्या. याप्रकारे इतर टोकरी बनवून घ्या. आता या टोकरीत बनवलेले चाट टाका. यावर चाट मसाला, लाल मिरची पावडर भुरभुरवा. हिरवी चटणी व चिंचेची चटणी वरून टाका. बारीक शेव टाकून टोकरी सजवा आणि टोकरी-चाट सर्व्ह करा.
टोकरी चाट (Tokri Chaat)
Link Copied