दूरदर्शनचा लोकप्रिय शो उडान ने एक काळ गाजवला. त्या काळातील लोकांनी टीव्हीवर एका स्त्रीला इतकी दमदार भूमिका करताना पहिल्यांदा पाहिलं. उडानमध्ये आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका साकारून अभिनेत्री कविता चौधरी घराघरात प्रसिद्ध झाली होती, पण त्यांच्या बद्दल एक दुःखद बातमी समोर आली आहे. कविता यांचे निधन झाले आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात येते.
वयाच्या 67 व्या वर्षी कविता यांनी जगाचा निरोप घेतला. 16 फेब्रुवारी रोजी सकाळी अमृतसरच्या पार्वती हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले. तेथे त्यांच्यावर काही काळ उपचार सुरू होते. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे त्यांचे बॅचमेट अनंग देसाई यांनीही त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्या कॅन्सरने त्रस्त होत्या तिच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला असून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. ती आमची हिरो होती, अशी प्रतिक्रिया चाहते देत आहेत.
कविता यांनी उडानमध्ये कल्याणी सिंहची भूमिका साकारली होती, जी प्रत्यक्षात तिची धाकटी बहीण कांचन चौधरीच्या वास्तविक जीवनापासून प्रेरित होती. याशिवाय, ती सर्फ जाहिरातींमध्ये देखील दिसायची जिथे लोक तिला ललिताजी नावाने ओळखू लागले. उडान व्यतिरिक्त, त्यांनी योर ऑनर आणि आयपीएस डायरीची निर्मिती केली.