साहित्य : 1 कप रवा, 1 बारीक कापलेला कांदा, अर्धे किसलेले गाजर, अर्धी वाटी मटार, 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून हळद, 8-10 कढीपत्त्याची पाने, 2 टेबलस्पून कोथिंबीर, 1 टीस्पून कापलेली मिरची, चवीनुसार मीठ, आवश्यकतेनुसार तेल.
कृती : कढईत रवा भाजून घ्या. रवा काढून कढईत तेल गरम करा. यात जिरे, मोहरी व कढीपत्त्याची फोडणी देऊन हिरवी मिरची व हळद टाका. थोडा वेळ परतून मटार आणि किसलेले गाजर टाका. काही मिनिटे परतून यात भाजलेला रवा टाका. अंदाजे पाणी टाकून मिश्रण चांगले ढवळून घ्या. मीठ टाका आणि झाकण ठेवून शिजवा. थोड्या वेळाने झाकण काढा. कोथिंबीर टाकून लिंबाच्या फोडीसह उपमा सर्व्ह करा.
उपमा (Upma)
Link Copied