आपल्या असामान्य फॅशन आणि बोल्ड कपड्यांमुळे सोशल मीडियावर लोकप्रिय असलेली उर्फी जावेद दररोज ट्रोलर्सचे लक्ष्य बनते. तिला तिच्या बोल्ड कपड्यांमुळे सोशल मीडियावर खूप काही ऐकावे लागते, परंतु उर्फी पण कोणी काय म्हणतं याने काही फरक पाडून घेत नाही. उर्फी जावेदबद्दल आता एक मोठी बातमी येत आहे. पोलिसांनी तिच्यावर मोठी कारवाई केली आहे. तिला अटक करण्यात आली आहे.
उर्फी जावेदचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोन महिला पोलिस तिला अटक करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती की, उर्फी जावेदवर अचानक एवढी मोठी कारवाई का करण्यात आली? हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही अटक खरी आहे की उर्फीचे नाटक आहे हे अद्याप लोकांना समजले नाही.
पापाराझींनी शेअर केलेला व्हिडिओ एका कॅफेच्या बाहेरचा आहे, जिथे दोन महिला पोलिस अधिकारी उर्फीला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यासाठी येतात. हे पाहून उर्फी आश्चर्यचकित होते आणि विचारते की हे सर्व काय आणि का करत आहात? तेव्हा महिला अधिकारी तिला तोकडे कपडे घालून फिरतेस म्हणून पोलीस स्टेशनला यावे लागेल असे सांगतात. यावर उर्फी म्हणते की, मला जे पाहिजे ते मी घालेल. मला अशा प्रकारे अटक करता येणार नाही. पण पोलीस तिला शांतपणे गाडीत बसायला सांगतात.
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे. उर्फीला खरोखर अटक झाली आहे का हे चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे. काही लोक याला प्रँक म्हणत असले आम्ही तपास केला तेव्हा आम्हाला कळले की उर्फीची अटक ही केवळ प्रचाराची नौटंकी होती. पापाराझी ज्या प्रकारे तिथे आधीच उपस्थित होते, ते पाहता ही संपूर्ण घटना स्क्रिप्टेड असल्याचे दिसते. असे सांगितले जात आहे की हे काही शो किंवा वेब सीरिजचे प्रमोशन देखील असू शकते.