व्हेज हॉट डॉग
साहित्य : 4 हॉट डॉग (लांब आकाराचा ब्रेड), थोडे बटर आणि हिरवी चटणी. सारणासाठी: 3 मध्यम आकाराचे बटाटे (उकडलेले आणि मॅश केलेले), 1 कप बारीक चिरलेल्या मिश्र भाज्या (कोबी, गाजर, सिमला मिरची आणि कांदा). 1/4 कप बारीक चिरलेला पुदिना, 1 टीस्पून लसूण पेस्ट, 1 टीस्पून आले-हिरवी मिरची पेस्ट, अर्ध्या लिंबाचा रस, 1 टीस्पून आमचूर पावडर, अर्धा टीस्पून हळद, 2 चमचे बटर, चवीनुसार मीठ.
कृती : कढईत बटर गरम करून त्यात लसूण आणि आले-हिरवी मिरची पेस्ट घाला. चिरलेल्या भाज्या घाला आणि हलके शिजवा, नंतर गॅस बंद करा आणि इतर साहित्य मिसळा. प्रत्येक हॉट डॉगच्या मध्यभागी एक चीरा पाडा.पावाच्या आत थोडे बटर आणि हिरवी चटणी भरा. आतमध्ये सारणाचे साहित्य भरा आणि तव्यावर थोडे बटर लावा आणि हॉट डॉग बेक करा. टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करा.