व्हेजिटेबल सूप
साहित्य : 6 कप व्हेजिटेबल स्टॉक, प्रत्येकी 1 गाजर, टोमॅटो, हिरवी मिरची व उकडलेला बटाटा (सर्व लांबट चिरलेले),
2 कांद्याच्या पाती (बारीक चिरलेले), प्रत्येकी 2 टीस्पून बारीक चिरलेली लसूण व सोया सॉस, प्रत्येकी 1 टीस्पून व्हिनेगर व चिली ऑईल, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर अर्धा कप पाण्यामध्ये घोळून, अर्धा टीस्पून अजिनोमोटो, स्वादानुसार मीठ व मिरी पूड.
कृती : कॉर्नफ्लोअरच्या मिश्रणाव्यतिरिक्त इतर सर्व साहित्य एकत्र करून त्यास उकळी येऊ द्या. हे मिश्रण 3 मिनिटे उकळवून नंतर त्यात कॉर्नफ्लोअरचे मिश्रण घाला. सतत ढवळत राहून
दोन मिनिटे उकळू द्या. गरमागरम सर्व्ह करा.
Link Copied