Close

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मृत्यू, बंद खोलीत आढळला मृतदेह (Veteran Actor Ravindra Mahajani Pass Away, DeadBody Found In Locked Room)

मराठी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवणारे, एकेकाळाचे चॉकलेट बॉय अशी ओळख असणारे अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. ते 77 वर्षांचे होते. तसेच गेल्या काही दिवसांपासून ते मावळ तालुक्यातील आंबी या ठिकाणी राहत होते. एका बंद खोलीत त्यांचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आंबी येथे एका फ्लॅटमध्ये ते गेले काही महिने भाड्याने एकटेच राहायचे. अचानक त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याचे शेजारच्यांच्या निदर्शनास आले. तसे त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून आत मध्ये प्रवेश करतात त्यांना रवींद्र महाजन यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांच्या अंदाजानुसार दोन-तीन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असावा. यासंबंधीची माहिती लगेचच त्यांच्या कुटुंबीयांना कळवण्यात आली. अभिनेता कश्मीर महाजनी हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे.

Who is Ravindra Mahajani? - Quora

रवींद्र महाजन यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांचे मुंबईचा फौजदार, देवता, गोंधळात गोंधळ, लक्ष्मीची पावलं, आराम हराम है यांसारखे चित्रपट खूप गाजले होते. त्यांच्या मृत्यूच्या बातमीमुळे सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.

Share this article