अभिनेता विद्युत जामवाल वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बॉलिवूडच्या ॲक्शन अभिनेत्याच्या यादीत विद्युत जामवाल अव्वल स्थानी आहे. अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. विद्युत जामवाल लवकरच ‘क्रॅक’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. अभिनेता सिनेमाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. कायम भयानक स्टंट करणारा विद्युत जामवाल पोलिसांच्या ताब्यात आहे. सार्वजनिक ठिकाणी धोकादायक स्टंट केल्यामुळे अभिनेत्याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर येत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेता विद्युत जामवाल याची चर्चा रंगली आहे.
रिपोर्टनुसार, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) च्या वांद्रे कार्यालयातून विद्युत जामवाल याचे काही फोटो सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे. अभिनेता पोलिस स्थानकात एका खूर्चीवर बसलेला दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आरपीएफ कार्यालय आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याला धोकादायक स्टंट केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आलं होतं, परंतु अद्याप संबंधीत प्रकरणी अधिकृत माहिती मिळालेली नाही.