व्हाईट ग्रेव्हीसह मलई कोफ्ता
साहित्य: कोफ्त्यासाठी: 100 ग्रॅम बटाटा, 50 ग्रॅम पनीर, थोडी कोथिंबीर, 1 चमचा हिरवी मिरची, अर्धा चमचा आले, 1 चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा वेलची पावडर, 5-5 ग्रॅम काजू बेदाणे, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल. पांढर्या ग्रेव्हीसाठी: 200 ग्रॅम काजू, 1 कांदा, 10-10 ग्रॅम हिरवी मिरची, बटर, आले-लसूण पेस्ट, 10 मि.ली. मलई, 30 मि.ली तेल.
कृती : कोफ्त्याचे साहित्य मिक्स करून कोफ्ता डीप फ्राय करून घ्या. पांढर्या ग्रेव्हीचे सर्व साहित्य एकत्र करून ग्रेव्ही तयार करा. कढईत तेल गरम करून त्यात हिरवी मिरची आणि पांढरी ग्रेव्ही घाला. सर्व्हिंग बाऊलमध्ये कोफ्ता ठेवा, त्यावर ग्रेव्ही घाला. क्रीम आणि हिरव्या कोथिंबीरने सजवा.