नीना गुप्ता सध्या 'लस्ट स्टोरीज २' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. 'लस्ट स्टोरीज २' मध्ये नीना गुप्ता एका बोल्ड आजीची भूमिका साकारत आहेत. जी उघडपणे सेक्सबद्दल बोलते. खऱ्या आयुष्यातही नीना गुप्ता तितक्याच बोल्ड आहेत आणि बिनधास्त मनमोकळेपणाने बोलतात. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान नीना यांनी मासिक पाळी आणि सेक्स या विषयावर मोकळेपणाने संवाद साधला. त्यांच्यामते सेक्सबद्दल बोलणे आवश्यक आहे.
'लस्ट स्टोरीज 2' च्या प्रमोशनमध्ये दिलेल्या मुलाखतीदरम्यान, नीना गुप्ता म्हणाल्या की त्यांच्या आईने त्यांना मासिक पाळी किंवा सेक्सबद्दल काहीही सांगितले नाही. एका मुलाखतीत वैयक्तिक आयुष्याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, "आम्हाला बराच काळ सेक्सबद्दल काहीही माहिती नव्हते. माझ्या आईने मला 'सेक्स' म्हणजे काय 'पीरियड्स' म्हणजे काय हे कधीच सांगितले नाही., माझी आई इतकी कडक होती की मी कॉलेजमध्ये असताना ती मला माझ्या मैत्रिणींसोबतही चित्रपट पाहायला जाऊ देत नव्हती.
नीना गुप्ता म्हणाल्या, "जुन्या काळी मुलींशी या महत्त्वाच्या विषयांवर अजिबात बोलले जात नव्हते. मुलीचे लग्न व्हायच्या आधी याविषयी थोडी माहिती दिली जात होती. हनिमूनमध्ये काय करायचे ते सांगितले जात होते. हे होईल, जेणेकरून मुलगी घाबरू नये किंवा मुलगा पळून जाऊ नये. लग्नाच्या आधी मुलींना मुलाला जन्म देणे ही त्यांची जबाबदारी असल्याचे सांगितले जात होते, आता जर पतीने सेक्सची इच्छा व्यक्त केली तर ती पूर्ण करण्याचे मुलीचे कर्तव्य असल्याचे त्यांना सांगितले जायचे.
नेटफ्लिक्स वरील 'लस्ट स्टोरीज २' या सीरिजमध्ये नीना एका आजीच्या भूमिकेत दिसणार आहे, जी सेक्सबाबत अगदी मोकळेपणाने बोलत असते. ट्रेलरमध्ये ती अंगद आणि मृणालला सेक्सचा सल्ला देताना दिसत आहे. ती त्याला म्हणते की छोटी कार खरेदी करण्यापूर्वी तुम्ही टेस्ट ड्राइव्ह करता मग लग्नापूर्वी टेस्ट ड्राइव्ह का नाही? त्यांच्या या सीनची बरीच चर्चा होत आहे. मात्र यावर या गोष्टी सांगणे आजीसाठी आवश्यक होते, जे आम्ही चित्रपटात सांगितले आहे, असे तो सांगतो.